एक भयानक सायकल प्रवास.....

एक भयानक सायकल प्रवास

उन्हाळ्याचे दिवस सुरू होते गावातील ‘विठ्ठलच' नवीनच लग्न झालं होत .
विठ्ठल हा मूळ कोल्हापूर, माणगावचा राहणारा तरुण होता. 
‘दिसायला धष्टपुष्ट अंगापिंडाने चांगलाच पहिलवान दिसत होता '
इचलकंजीतील एका साखर कारखान्यात कामाला होता.

ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा मोटार सायकल वगैरे काही नव्हते.
रोजचा प्रवास हा बस ने नाही तर सायकल ने करावा लागत.....;
विठ्ठलचा रोजचा प्रवास हा सायकल वरच होत असे ..!
अंगात तरुणाईचं रक्त सळसळत होत ;
‘सकाळी लवकर उठून सायकल वरून कामावर जाणे व संध्याकाळी परत येणे हा त्याचा दिनक्रम होता....,,
आता त्याचे नवीनच लग्न झाले होते मिरज पासून 25Km अंतरावर त्याची सासरवाडी लहानसे गाव होते जुजारपुर नावचे .....;
गाव छोटे होते काहीसे १०००,१२००लोक राहत असतील.
गावात कोणते ही वाहन येत नव्हते ; गावाच्या आत मध्ये जाण्यासाठी एक फाटा होता, लोकवस्ती पासून ५ ते 7 km अंतरावर तिथे पर्यंतच बस वाहतूक असे सकाळी ९वाजता एक बस येत असे त्यानंतर रात्रीच 7 वाजता शेवट बस असे.गावातील पुरुष लोक ही सहसा सायकलने प्रवास करत,
गावात जाणारा रस्ता हा खूपच शांत असायचा जंगलातून थोडासा असा होता.
रात्रीच सहसा कोण त्या रस्त्यावरून येत नसे....
खूपच भयंकर होता तो रस्ता,
लग्नाच्या काही दिवसांनी विठ्ठल आपल्या पत्नीला ती आजारी असल्या मुळे तिला बरं वाटेल म्हणून तिच्या माहेरी सोडून आला होता,८ दिवस झाले होते;

सोडून आला होता खरं याचं कोणत्या कामात मन लागत नव्हते;
शेवटी त्याने आपल्या पत्नीला भेटायला जायचं ठरवलं ; कामावर निघताना त्याने घरच्यांना सांगितले होते ! की आज संध्याकाळी कामावरुनच मी तिला भेटायला जाणार आहे आणि उद्या सकाळी पर्यंत परत येईन असं सांगून तो सायकल कडून घराबाहेर पडला...;

कामावर याचे काय लक्ष लागत नव्हते .... 
शेवटी संध्याकाळ झाली कामाची सुट्टी झाली ६ वाजले होते ; त्याने लगेच सायकल काडली आणि सासरवाडीच रस्ता पकडला....;
सायकल वरून 4 तासांचा रस्ता होता तो.
विठ्ठल लवकर पोहलेला बर म्हणून लवकर लवकर सायकल चे पेंडल मरात होता .
काही २ तासात तो मिरज मधे येऊन पोहचला ‘त्याच्या सायकल ला एक अर्मेचर बल्ब होता’; समोरच्या बाजूला सायकल चालू लागली की त्याच्या थोडा प्रकाश पडत होता.......;
सायकल चालवून थोडा थकला होता त्यामुळे थोडी विश्रांती घेण्यासाठी एका हॉटेल मधे थांबला होता तिथे त्याने चहा पिला आणि एक सिगरेट ओढून शांत बसला .
कामावर लागल्या पासून सिगरेट ची सवय लागली होती त्याला...;
सासरवाडीमधे गेल्या नंतर भेटणार नाही म्हणून ३,४ सिगरेट ज्यादाच घेऊन ठेवला....!
थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर तो परत आपल्या मार्गी लागला...त्याला काय माहित होत त्याच्या या प्रवासामध्ये पुढे काय होणार आहे ते....;
रात्रीचे 9 वाजून गेले होते पण हा अजून सायकलवरच होता . मधेच त्याच्या सायकलचा टायर पंक्चर ;अधिच खूप वेळ झाला होता त्यात या सायकल ने मध्येच घोळ घातला होता ;तो सायकल वरून उतरून थोडा अंतर चालत पुढे आला... 
कुठे सायकल दुरूस्ती दुकान भेटते का शोधू लागला 2,3km चालल्यानंतर तो एका गावात आला.
गावात काही लोक कट्ट्यावर गप्पा मारता बसले होते ;
येवढ्या रात्री कोण तर व्यक्ती सायकल घेऊन चालत येतेले पाहून त्यांनी विठ्ठलची चौकशी केली ;काय झाल आहे म्हणून तेव्हा विठ्ठलने सांगितला की तोजुजारपुर ला निघाला आहे आणि त्याच्या सायकलचा टायर पंक्चर झाला आहे....! 
गावातील लोक तसे चांगले होते त्यातील एक मेकॅनक होता त्याने विठ्ठलच्या सायकलचा टायर पंक्चर कडून दिला .
पण त्या गावकऱ्यांनी विठ्ठलला पुढे जाण्यास विरोध केला;
कारण खूप वेळ झाली होती रात्रीचे १०वाजून गेले होते ते गावकरी विठ्ठलला आज इथचे गावात मुक्काम करायला सांगत होते , कारण पुढचा रस्ता हा एकट्या माणसाला जाण्यासाठी योग्य नव्हता . 
गावकऱ्यांनी विठ्ठल खूप समजावण्याचा प्रयत्न केला ; आता विठ्ठल थोडा घाबरला होता पण त्याला जाने गरजेचे होते , किती पण वेळ झाला तरी आज जायचं होते .
त्याने गावकऱ्यांचे आभार मानून त्यांचा निरोप घेऊन निघाला ;तिथून पुढं १०km अंतरावर जुजारपुर गाव होते . इथून पुढचा रस्ता हा जंगलातून होता; रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठी मोठी झाडं होती...पूर्ण रस्ता निर्मनुष्य होता....कोण मागे नाही का कोण पुढे नाही .....
विठ्ठल एकटाच त्या सूनसान रस्त्यावरून जात होता; त्यात फक्त त्याच्या सायकलच्या आर्मेचर बल्ब चा अंधुक प्रकाश होता ; पौर्णिमेची रात्र होती चंद्राचा प्रकाश पडला होता थोडा.
मधूनच आकाशात ढग चंद्रा आड येऊन काळोख होत होता.रस्त्या पूर्ण शांत होता ; जंगलातून रातकिड्यांचे किर्र किर्र आवाज येत होते ,मधूनच कुत्री भुंकण्याचा भयंकर आवाज येत होता..... हे सगळं पाहून विठ्ठल पुरता घाबरला होता....;त्याला आता घाम फुटू लागला होता....;
तो स्वतशीच मनात विचार करू लागला गावातील लोक सांगत होते तेच योग्य होता आपण त्यांचं न ऐकून चूक तर केली नाही ना....असे अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागले होते....; त्याच विचारत तो सायकल चालवत होता ; त्याला त्या रस्त्याच्या झाडांमध्ये वेगळ्या वेगळ्या आकृत्या दिसू लागल्या होत्या...त्यामुळे त्याला अजूनच जास्त भीती वाटू लागली होती; 
आता....थोडे पुढे आल्यानंतर त्याला हवेत खूप गारवा जाणवू लागला थोड्या वेळा पूर्वी घामाने लतपत झालेल्या विठ्ठलला आता खूप थंडी वाजू लागली होती अंग गोठून जाण्या इतकी.....;
त्याला कळून चुकले होते की आजची रात्र ही त्याच्या साठी खूप वाईट ठरणार आहे....,
त्याच भितीत तो सायकल चालवत होता....;थोडे अंतर पार केल्यावर लांबूनच रस्तावर एक वडाचे झाड दिसले ; विचित्र आकाराचे होते ते त्याच्या पारंब्या खाली जमिनीवर पर्यंत लोबकळत होत्या दिवसा गजबलेला तो रस्ता रात्री असा एवढा भयंकर असेल असं कधी विठ्ठलला वाटले नव्हते....
तो आता मनाला कस बस सावरत सायकल चालवत होता....त्याला लांबूनच त्या वडाच्या झाडा मागे एक विचित्र प्रकार दिसून आला....;
मनात तर नको नको ते विचार येत होते ,त्यात याची भर त्यात पडली....; त्याला कस पण करून हा रस्ता पार करून संपवायचा होता ...;
मनाला थोड घट्ट करत तो पुढे आला ,त्याला थोड्या दुरूनच वडाच्या झाडाच्या आडोशाला कोण तर बसलेला भास झाला ....आता तो त्या झाडापासून थोड्याच अंतावर होता ;
त्याला आता खात्री झाली की नक्कीच त्या झाडाजवळ कोणी तरी बसलेला आहे.....; 
जसं जसं तो त्या झाडाजवळ येईल तसं तसं त्या झाडाजवळ ची वक्ती देखील बाहेर तोंड कडून वाकून वाकून त्याच्याकडे पाहु लागली......; विठ्ठलला आता काही सुचत नव्हते त्याने विचार केला थोडा आता परत मागे जाणे तर काय शक्य नव्हते....;
त्याला पुढेच जावं लागणार होता आता तो जवळ जवळ त्या वडाच्या झाडापर्यंत पोहचला होता....;
त्याने मान घट्ट करून त्या झाडाकडे एक नजर टाकली त्याला तिथे कोणाच दिसला नाही....;
पण तो खूप घाबरला होता....,
तो मनात विचार करत होता की आपल्याला भीती मुळे भास झाला असेल ....,
म्हणून तो परत पुढे जाण्यासाठी सायकल चालवू लागला ;तेवढ्यात मागून एक विचित्र अशी किंचाळी त्याच्या कानी पडली त्याने मागे वळून पाहिलं तर पांढऱ्या शुभ्र साडी मध्ये एक बाई म्हणजे एक पिशाचिनी त्याच्या मागे उभी होती तिचा चेहेरा पूर्ण पांढरा आणि चेहऱ्यावर रक्ताचे सुखलेले डाग होते ,केस विस्कटलेले, विचित्र चेहऱ्याची जीभ बाहेर काढत......खूप मोठ्या आवाजात किंचाळत होती आणि मोठ्या मोठ्याने हसत होती....,
तिचा आवाज आसपास सगळी कडे गुंजत होता....;हे सगळं पाहून विठ्ठलच्या अंगातून घाम फुटून पूर्ण कपडे ओले झाले होते;ओठ सुकून गेले त्याच्या पोटात गोळा आला ; त्याला पण समजला की आता आपण एका पिशाचिनीच्या डावात अडकलो आहे....,
आज काय आपला खरं नाही या भीतीने तो जेवढा होईल तेवढ्या ताकदीने सायकल चालवण्याचा प्रयत्न करु लागला.
ती पिशाचिन त्याच्या मागे धावू लागली....;
मोठ्याने हवा देखील सुरू झाली होती ; झाडातून मोठ्याने सळसळ आवाज सुरू झाले ...विठ्ठल आपला प्राण एकवटून सायकल चालवत होता....,
ती त्याला पकडन्या साठी धावत होती त्याच्या सायकल पकडणार तेवढ्यात विठ्ठलने सायकालचा वेग वाढवला...
ती तसाच त्याच्या किंचाळी फोडत मागे लागली ....;
ती मोठ्या कर्कश आवाजात ओरडत होती....,
“थांब रे थांब पळून पळून किती पाळणार आहेस" .....!
“माझा इलका आहे हा "....“तुला सोडत नाही असं मी” ....!
असा बोलून जोरात हसतहोती...!
विठ्ठलने मनात ठरवलं...;काही पण झाला तर आपण आता थांबायचं नाही..., तो सारखा सारखा मागे वळुन पाहत होता. ती पिशाचीनी त्याच्या सायकलच्या १ते २हात अंतरावर होती ....,
त्या चंद्राच्या प्रकाशा मध्ये त्याला आता तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता खूपच भयंकर होता तो .

ती कधी २ पायावर धावत होती, तर कधी एकाद्या जनवरासारखा दोन्ही हातांवर आणि पायांवर, त्याच्या मागे धावत होती ....,
त्या सुनसान रस्त्यावर या दोघांशिवाय कोणच नव्हते...., विठ्ठलच्या तोंडातून एक शब्द ही निघत नव्हता....,

त्याच्या मनात एकच सुरू होत “आपण जर हिच्या तावडीत सापडलो तर आपला काही खरं नाही".... 
विठ्ठल आता घामाने चिंब भिजला होता...;
वेगात सायकल चालवून त्याला दम पण खुप लागला होता....,
तरी देखील त्याने हार मानायच नाही असे ठरवलं .... !
संपूर्ण जीव एकवटून तो सायकल चालवू लागला....;
त्याला लांबूनच गावाच्या फाट्याची वेस दिसू लागली....;
तो जेवढा गतीने सायकल चवलता येईल तेवढ्या गतीने चालवू लागला....;
ती अजून देखील त्याच्या मागेच होती....,
शेवटी विठ्ठल कसा बसा गावाच्या वेशी जवळ आला ; तो जसा त्या वेशीच्या आत मधे प्रवेश केला तसे ती पिशाचिन त्या वेशी बाहेरच थांबली ....!
‘कदाचित गावाच्या वेशीबाहेर पर्यंतच तिची मर्यादा होती .

ती तिथे थांबून मोठ्या मोठ्या आवाजात किंचाळत ओरडत होती.....!
तिच्या त्या किंचाळी मधे खुप चिड आणि राग होता....;
तिच्या हाती आलेला विठ्ठल तिच्या ताब्यातून सुटलेला होता..

विठ्ठलला देखील आता समजला की तिची हद्द ही गावाच्या वेशी बाहेर पर्यंतच आहे...;
त्याने सायकल थांबली आणि तिच्याकडे पाहिलं ती आपल्या दोन्ही हाताने स्वतःच्या चेहऱ्यावर नखाने ओरबाडून घेत खूप मोठ्याने किंचाळत ओरडत होती;
“खूप मोठे नशीब आहे रे तुझं आज वाचलास ,माझ्या तावडीतुन” ....“परत घावशिल की”....!
त्या आवाजात खुप चिड आणि राग होता....;
‘तिने शेवटचं विठ्ठलकडे बघितला आणि एक मोठी किंचाळी किंचाळी फोडत...उलट्या पायाने चालत अंधारात गायब झाली';
विठ्ठलने सुटकेचा स्वास घेतला .त्याचे पाय थर-थर कपात होते ,त्याला अजून देखील विश्वास बसत नव्हता की आपण त्या पिशाचीनीच्या हातातून वाचलो आहोत .....,
त्याने लगेच आपली सायकल कडली आणि पुढे निघून घरी आला येवढ्या उशिरा आलेला पाहून घरातील सर्व लोक जमा झाले...; विठ्ठाल काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता;

थोडा वेळ बसून राहिल्यावर त्याने थोडा पाणी पीला त्याला थोड बरं वाटलं...;
सगळ शांत झाल्यानंतर त्याने जे त्याच्यासोबत घडलेली हकीकत सगळ्यांना सांगु लागला.....;
त्याचा सगळा ऐकल्या नंतर घरातील वयस्कर लोकांनी त्याला सांगितले की तुमचं नशीब खुप मोठा आहे त्यामुळे तुमचे आज प्राण वाचले ....!
नाही तर त्या पिशाचिनीच्या तावडीत जे जे सापडेल ते परत कधी आले नाहीत...!


समाप्त...

Comments

Popular posts from this blog

ती परत येणार आहे.....!

जातीच्या बेड्या