जातीच्या बेड्या



      का येतात आडव्या या जातीच्या बेड्या...,
      का नाही समजत यांना लोकांच्या भावना...,

      का उभे राहतात हे पुढे  जातींचे डोंगर,
      का नेहमी सामोरे जावं लागतं  या
      जाती धर्माच्या संकटाना...

      किती होणार ही घुसमट,
      किती जाणार बळी या
      जाती धर्माच्या अत्याचारांना

      कधी भेटणार मोकळा श्वास,
      का  अडकून राहणार अजून पण
      जातींच्या विळख्यात या माणसांना...

      का येतात आडव्या या जातीच्या बेड्या...
      का नाही समजत यांना लोकांच्या भावना...,

      का नाही समजत यांना लोकांच्या भावना....


कुलदिप शिंगे......

Comments

Popular posts from this blog

ती परत येणार आहे.....!

एक भयानक सायकल प्रवास.....