एक भयानक सायकल प्रवास.....
एक भयानक सायकल प्रवास उन्हाळ्याचे दिवस सुरू होते गावातील ‘विठ्ठलच' नवीनच लग्न झालं होत . विठ्ठल हा मूळ कोल्हापूर, माणगावचा राहणारा तरुण होता. ‘दिसायला धष्टपुष्ट अंगापिंडाने चांगलाच पहिलवान दिसत होता ' इचलकंजीतील एका साखर कारखान्यात कामाला होता. ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा मोटार सायकल वगैरे काही नव्हते. रोजचा प्रवास हा बस ने नाही तर सायकल ने करावा लागत.....; विठ्ठलचा रोजचा प्रवास हा सायकल वरच होत असे ..! अंगात तरुणाईचं रक्त सळसळत होत ; ‘सकाळी लवकर उठून सायकल वरून कामावर जाणे व संध्याकाळी परत येणे हा त्याचा दिनक्रम होता....,, आता त्याचे नवीनच लग्न झाले होते मिरज पासून 25Km अंतरावर त्याची सासरवाडी लहानसे गाव होते जुजारपुर नावचे .....; गाव छोटे होते काहीसे १०००,१२००लोक राहत असतील. गावात कोणते ही वाहन येत नव्हते ; गावाच्या आत मध्ये जाण्यासाठी एक फाटा होता, लोकवस्ती पासून ५ ते 7 km अंतरावर तिथे पर्यंतच बस वाहतूक असे सकाळी ९वाजता एक बस येत असे त्यानंतर रात्रीच 7 वाजता शेवट बस असे.गावातील पुरुष लोक ही सहसा सायकलने प्रवास करत, गावात जाणारा रस्ता हा खू...