Posts

एक भयानक सायकल प्रवास.....

Image
एक भयानक सायकल प्रवास उन्हाळ्याचे दिवस सुरू होते गावातील ‘विठ्ठलच' नवीनच लग्न झालं होत . विठ्ठल हा मूळ कोल्हापूर, माणगावचा राहणारा तरुण होता.  ‘दिसायला धष्टपुष्ट अंगापिंडाने चांगलाच पहिलवान दिसत होता ' इचलकंजीतील एका साखर कारखान्यात कामाला होता. ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा मोटार सायकल वगैरे काही नव्हते. रोजचा प्रवास हा बस ने नाही तर सायकल ने करावा लागत.....; विठ्ठलचा रोजचा प्रवास हा सायकल वरच होत असे ..! अंगात तरुणाईचं रक्त सळसळत होत ; ‘सकाळी लवकर उठून सायकल वरून कामावर जाणे व संध्याकाळी परत येणे हा त्याचा दिनक्रम होता....,, आता त्याचे नवीनच लग्न झाले होते मिरज पासून 25Km अंतरावर त्याची सासरवाडी लहानसे गाव होते जुजारपुर नावचे .....; गाव छोटे होते काहीसे १०००,१२००लोक राहत असतील. गावात कोणते ही वाहन येत नव्हते ; गावाच्या आत मध्ये जाण्यासाठी एक फाटा होता, लोकवस्ती पासून ५ ते 7 km अंतरावर तिथे पर्यंतच बस वाहतूक असे सकाळी ९वाजता एक बस येत असे त्यानंतर रात्रीच 7 वाजता शेवट बस असे.गावातील पुरुष लोक ही सहसा सायकलने प्रवास करत, गावात जाणारा रस्ता हा खू...

जातीच्या बेड्या

Image
      का येतात आडव्या या जातीच्या बेड्या...,       का नाही समजत यांना लोकांच्या भावना...,       का उभे राहतात हे पुढे  जातींचे डोंगर,       का नेहमी सामोरे जावं लागतं  या       जाती धर्माच्या संकटाना...       किती होणार ही घुसमट,       किती जाणार बळी या       जाती धर्माच्या अत्याचारांना       कधी भेटणार मोकळा श्वास,       का  अडकून राहणार अजून पण       जातींच्या विळख्यात या माणसांना...       का येतात आडव्या या जातीच्या बेड्या...       का नाही समजत यांना लोकांच्या भावना...,       का नाही समजत यांना लोकांच्या भावना.... कुलदिप शिंगे......

ती परत येणार आहे.....!

Image
ती परत येणार आहे.....! Hello.... hello ...... अरे दीपक भाऊ ...! आवाज ओळखतो काय गरिबांचा....का विसरला? Hello..... बोल की सुम्या साल्यानो तुम्हाला विसरून कस चालेल...जिवंत राहायचं आहे आम्हाला. बोल भाऊ कसा आहेस...झाल्या ना exam... लवकर आवरून ये ... भाऊ सगळे तुझीच वाट पाहत आहेत.सगळा प्लॅन करायचा आहे आपल्या trip चा. अरे हो झाली ना ....आज काय last paper देऊन निघतोय इथून. बरं लवकर ये तु आपल्याला मोठा प्लॅन करायचं आहे चांगला. ७,८ दिवस मोठी ट्रीप करायची आहे आपल्याला... हो पण कुठे जायचं नक्की ? कोंकण दर्शन ला जायचं आहे...म्हणजे पॉइंट अजून फिक्स नाही झाले तू ये मग करू फिक्स तुम्हाला चांगली माहिती आहे राव कोकणची. कोकण हा शब्द ऐकल्या बरोबर दीपक च्या अंगावर काटा आला. हा पण नेमके कोणते पॉइंट ठरवलाय तुम्ही....? दादा तू ये इकडे पहिला मग ठरवू पण कुणकेश्वर मध्ये राजन च्या हॉटेल मधे राहू. आता कुणकेश्वर हे नाव ऐकताच दिपकच्या अंगावर परत शहारे आले. त्याने लगेचच सुमितला बोलला काय यार तुम्हाला दुसरा कोणता पॉइंट भेटला नाही का..? कुणकेश्वर सोडून दुसरीकडे कुठे पण वस्ती करू. ...